तोतया पोलिसाला कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या आहेत. आम्ही पोलीस असून तुमची चौकशी करायची आहे. असं सांगून ते दोघे इंद्रजितची दुचाकी घेऊन पसार झाले. यानंतर इंद्रजीतने कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दिली. आणि त्यानंतर अवघ्या तीन तासाच्या आत कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी दिलीप पाटील या तोतया पोलिसाला बेड्या ठोकल्या. दिलीप अशाच प्रकारे पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकांना लुटण्याची त्याची पार्श्वभूमी असून या पूर्वी तो वाहतूक वॉर्डनचे काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.