नागरिक आणि चालकाच्या सतर्कतेमुळे वाचले विद्यार्थ्यांचे प्राण

एका शाळेच्या व्हॅन ला अचानक लागलेल्या आगीतुन, नागरिक आणि चालकच्या सतर्कतेमुळे 10 ते 12 विद्यार्थ्याचे प्राण वाचले. नवी मुंबईतील वाशी मधील सेंट मेरी शाळेच्या स्कूल वॅन ला अचानक आग लागल्याने एकच तारांबळ उडाली, काही नागरिकांना व्हॅन च्या खालील बाजूने धूर येत असल्याचे निदर्शनात आले, त्यामुळे त्यांनी चालकाच्या ही बाब लक्षात आणून दिल्याने चालकाने व्हॅन थांबवून इतर नागरिकांच्या मदतीने सर्व विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढले, व्हॅन मध्ये10 ते 12 विद्यार्थी होते,आग वाढण्याआधी सर्व विद्यार्थांना काढले बाहेर त्यामुळे अनर्थ टळला.अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी पोहोचून लागलेली आग आटोक्यात आणली, मात्र काही प्रमाणात व्हॅनचे नुकसान झाले आहे. नागरिकांनी केलेली मदत आणि चालकाने दाखवलेली सतर्कता यामुळे 10 ते 12 विद्यार्थ्यांचे प्राण वाचले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading