कोरोनाच्या काळात महापालिकेच्या तिजोरीत ३२२ कोटी रूपये जमा

कोरोना काळामध्ये सर्वसामान्यांची आर्थिक घडी काहीशी विस्कटली असतानाही महापालिकेच्या तिजोरीत ३२२ कोटी रूपये कर रूपाने जमा झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत याच कालावधीत जमा झालेल्या रक्कमेच्या तुलनेत ही रक्कम २५ कोटी रूपयांनी कमी आहे. कोरोनामुळे महापालिकेचीही आर्थिक घडी विस्कटली होती. कोरोनामुळे महापालिकेची वसुलीही काहीशी रखडली होती. त्याचा विकास कामांवर परिणाम झाला होता. मात्र पालिकेनं आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कर वसुलीवर भर दिला त्यानंतर मोठ्या प्रमाणावर कर वसुलीला प्रतिसादही मिळाला. महापालिकेनं कर भरणं सहज सुलभ व्हावं म्हणून कर भरण्याची ऑनलाईन सुविधा, मोबाईल सुविधा त्याचप्रमाणे करामध्ये काही सवलतही दिली होती. त्याचाच हा परिणाम असल्याचं सांगितलं जातं. कोरोनाचं प्रमाण ज्याप्रमाणे माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीमध्ये अधिक दिसून आलं त्याचप्रमाणे कर वसुलीलाही या प्रभाग समितीतून मोठा प्रतिसाद मिळाला. त्याचप्रमाणे मुंब्रा प्रभाग समितीमध्ये कोरोनाचं प्रमाण कमी राहिलं तसंच कर भरणाही कमी झाल्याचं दिसून आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading