कोपरीमधील शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरून ठाकरे आणि शिंदे गटातील शिवसैनिक एकमेकांसमोर उभे ठाकल्यानं तणाव निर्माण झाला होता. कोळीवाड्यात १९७२ मध्ये कुंभारवाडा शिवसेना शाखेची स्थापना झाली होती. ही शाखा ताब्यात घेण्यावरून शिवसेनेच्या दोन गटात हा वाद झाला. कोपरी पोलीसांनी त्वरीत केलेल्या हालचालीमुळे हा वाद वाढला नाही. पोलीसांनी दोन्ही गटाची समजूत घालून त्यांना बाजूला केल्यामुळे पुढील वाद टळला.`1