ठाणे पनवेल उपनगरीय गाडीमध्ये महिलांच्या डब्यात जोरदार वादावादी

ठाणे पनवेल उपनगरीय गाडीमध्ये महिलांच्या डब्यात जोरदार वादावादी झाली. यामध्ये ३ महिला जखमी झाल्या असून यामध्ये एका महिला कॉन्स्टेबलचाही समावेश आहे. शारदा ओगले या महिला कॉन्स्टेबल भांडण सोडवायला गेल्या असताना इतर महिलांनी त्यांनाही प्रतिसाद दिल्यामुळे त्या जखमी झाल्या. बसण्याच्या जागेवरून हा वाद झाला. या वादाचा व्हीडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. या व्हीडीओमध्ये या महिला एकमेकींच्या झिंज्या उपटून भांडत असल्याचं दिसत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading