वागळे इस्टेट येथे एका नराधमाने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर

वागळे इस्टेट येथे एका नराधमाने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या वाढदिवसानिमित्त लहान‌ विद्यार्थ्यासाठी वागळे इस्टेट परिसरातील श्री आनंद दिघे उद्यानात चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते, यामध्ये आर जे ठाकूर, ज्ञानोदय वगैरे शाळांमधून सुमारे अडीच हजार विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत भाग घेतलेल्या आपल्या मोठ्या मुलीस परत आणण्यासाठी आपल्या ६ वर्षीय लहान मुलीसह आलेली आई या मुलीला समोरील बागेत खेळण्यास सोडून मोठ्या मुलीस आणायला गेली होती. त्यावेळी एका व्यक्तीने या ६ वर्षीय‌ मूलीस फुस लावून‌ त्या बागेतून‌ काही अंतरावरील एका रिक्शात बसविले आणि अश्लील‌ चाळे केले तेव्हा या मुलीने रडायला सूरुवात केली, म्हणून त्या व्यक्तीनं तीला परत ग्राऊंडवर सोडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रडण्याच्या आवाजाने आणि ती पर्यंत तिच्याच शोधात असलेल्या आईच्या दृष्टीस ती पडली, आईने आरडाओरड केली असता ती व्यक्ती पळून‌ जाऊ लागली. पण तिला काही लोकांनी पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले. केवळ नशीब बलवत्तर होते म्हणून फार मोठा अनर्थ टळला खरा परंतु या घटनेमुळे पालकात आणि लहान मुलात आक्रोष आणि भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात आयोजन असल्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त का नव्हता असा प्रश्न आपं ने उपस्थित केला आहे?

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading