ठाणे महापालिका विविध प्रकत्पांवर कोट्यावधींचा खर्च करत असते मात्र भावि जिवनाचा पाया असणाऱ्या मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करत आहे. महानगरपालिका सध्या स्मार्ट सिटी अंतर्गत शहरांमध्ये रंगरंगोटी रस्ते करण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करत असून त्याच मनपाच्या शाळेतील विद्यार्थ्यांची जागे विना हाल होत आहे. मनपा कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जुना बाजार शाळेमध्ये पहिली ते पाचवी पर्यंत विद्यार्थी शिकतात. या शाळेचे काम करायचे होते म्हणून फक्त पत्र काढले. परंतु नंतर त्यात बदल झाला त्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापकांनी तात्पुरती मंदिराची जागा घेतली होती परंतु स्मार्ट सिटी अंतर्गत या शाळेचे पुढील बांधकाम होणार असून वेळ लागणार आहे तरी विद्यार्थ्यांचे हाल होत आहे, या वर्ग खोल्यांमध्ये फॅन सुद्धा लावलेला नाही. पहिली ते पाचवीपर्यंत 90 विद्यार्थी या शाळेमध्ये शिकतात. परंतु त्यांना सुविधा मिळत नाही लवकरच या शाळेचे काम होणार असल्याचे मुख्याध्यापक यांनी सांगितले आहे