ठाण्यामध्ये महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

ठाण्यामध्ये महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातिल विविध शिव मंदिरांमध्ये महादेवाचं दर्शन घेण्यासाठी भावीकांच्या रांगा लागल्याचं दिसतं होतं. महाशिवरात्री हा भारतातील पवित्र उत्सवांपैकी एक मोठा उत्सव मानला जातो. देशभरात हिंदू धर्मीय लोक महाशिवरात्री मोठ्या उत्साहाने साजरी करतात. महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थान तसेच इतर विविध ठिकाणी असलेल्या शिवमंदिरात दरवर्षी शिवभक्त दर्शनाकरीता मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असतात. यंदा करोना विषयेक कोणतेही निर्बंध नसल्यामुळे भक्तांनी महादेवाच्या दर्शनासाठी विविध मंदिरां मध्ये गर्दि केली होती. भाविकांबरोबरचं प्राण्यांनीही महादेवाचं दर्शन घेण्यासाठी कोपनेश्वर मंदिरात धाव घेतली होती. ठाणे बॉम्ब शोधनाशक पथकाच्या श्वानानंही नतमस्तक होत महादेवाचं दर्शन घेतलं. ठाण्यातील विविध शिवमंदिरांवर रोषणाई करण्यात आली होती. तसंच फुलांनी ही मंदिरं सजवण्यातही आली होती. ठाण्यातील कौपिनेश्वर मंदिरासह विविध शिव मंदिरांमध्ये नयनरम्य रोषणाई बरोबरचं फुलांची आकर्षक सजावटही करण्यात आली होती.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading