कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या प्रारुप मतदार याद्या 23 नोव्हेंबर रोजी प्रसिध्द होणार

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतदार याद्या तयार करण्याबाबतच्या कार्यक्रमांतर्गत प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी उद्या होणार असल्याची माहिती कोकण विभागाचे उप आयुक्त मनोज रानडे यांनी दिली. भारत निवडणूक आयोगाकडून कोकण विभाग शिक्षक मतदार संघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत असून कोकण विभाग मतदार संघातील प्रारुप मतदार याद्या आणि नोटीस 5 ची प्रसिध्दी करण्यात येणार आहे. या प्रारुप मतदार याद्या कोकण विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय, कोकण भवन, सीबीडी बेलापूर तसेच जिल्हाधिकारी तथा सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग यांची कार्यालये आणि संबंधित जिल्ह्यातील इतर पदनिर्देशित अधिका-यांची कार्यालये या ठिकाणी प्रसिध्द करण्यात येणार आहेत. संबंधित कार्यालयांमध्ये 23 नोव्हेंबर पासून प्रारुप मतदार याद्या मतदारांना तपासणीसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर या कालावधीत प्रसिध्द झालेल्या मतदार याद्यांवरील दावे-हरकती स्वीकारण्यात येतील. 25 डिसेंबर रोजी दावे – हरकती निकाली काढून पुरवणी यादी छपाई करण्यात येईल.30 डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येईल. अशी माहिती कोकण विभागाचे उप आयुक्त मनोज रानडे यांनी दिली आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading