किशोरवयीन मुलांचे सोमवारपासून लसीकरण – महापालिका हद्दीत 14 लसीकरण केंद्रे कार्यान्वित

शहरातील १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांचे लसीकरण ३ जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. यासाठी महापालिका यंत्रणा सज्ज झाली असून ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण 14 केंद्रावर लसीकरण सकाळी 10 ते सायं. 6 या वेळेत सुरू राहणार असल्याची माहिती महापौर आणि महापालिका आयुक्तांनी दिली. आरोग्य मंत्रालयाने जाहिर केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार ठाणे महापालिका हद्दीत 15 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलांच्या लसीकरणास सुरूवात होणार आहे. ठाणे महापालिका हद्दीतील जोशी- बेडेकर महाविद्यालय (ठाणे कॉलेज) क्रिक रोड ठाणे प., सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, परबवाडी, ठाणे, आनंदनगर लसीकरण केंद्र –चेकनाका ठाणे पूर्व, ,आर.जे. ठाकूर महाविद्यालय-लोकमान्यनगर, ठाणे, ब्राह्मण विद्यालय, वर्तकनगर, ठाणे, सेंट झेवियर्स शाळा, मानपाडा, ठाणे, सरस्वती शाळा, आनंदनगर, कासारवडवली ठाणे, ब्राह्मण शिक्षण मंडळ इंग्लिश मिडियम स्कूल, घंटाळी मंदिरामागे, घंटाळी ठाणे, महिला लसीकरण केंद्र, टेंभीनाका, ठाणे प.,सहकार विद्या प्रसारक मंडळ (सह्याद्री शाळा), मुंबई पुणे रोड कळवा, काळसेकर महाविद्यालय, मुंब्रा, एस.एन.जी. शाळा, दिवा, जी.आर.पाटील महाविद्यालय, मुंब्रा, पार्किंग प्लाझा, (ऑनलाईन) आणि ज्युपिटर रुग्णालयाशेजारी, ठाणे या लसीकरण केंद्रावर 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण होणार आहे. तर ठाण्यातील पार्किंग प्लाझा या लसीकरण केंद्रावर ऑनलाईन पध्दतीने लसीकरण सुरू होणार असून यासाठी कोविन ॲपवर नोंदणी करणे आवश्यक असणार आहे. १५ ते १८ वर्षांची मुले लसीकरणासाठी आपल्या आयडी कार्डवरून कोविन अॅपवर नोंदणी करू शकतात. २००७ किंवा त्यापूर्वी जन्मलेली सर्व किशोरवयीन मुले या लसीकरणासाठी पात्र आहेत. ते ऑनलाइन किंवा केंद्रात जाऊन नोंदणी करू शकतात. ३ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या लसीकरणामध्ये किशोरवयीन मुलांसाठी कोवॅक्सिन लसीचा एकमेव पर्याय उपलब्ध आहे. तरी सर्व नागरिकांनी आपल्या 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन महापालिकेने केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading