जिल्ह्यात कोरोनाचे ७१४ नवे रूग्ण

जिल्ह्यात कोरोनाचे ७१४ नवे रूग्ण आढळले असून दिवसभरात एकही मृत्यू झाला नाही. सध्या जिल्ह्यात १ हजार ९१३ अक्टीव्ह रूग्ण आहेत. तर आत्तापर्यंत ११ हजार ६१६ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात आज २५५ नवे रूग्ण मिळाले तर ० मृत्यू, सध्या ५०७ रूग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत २ हजार १०९ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये ६७ नवे रूग्ण, ० मृत्यू तर २९८ रूग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत २ हजार ८५१ रूग्ण दगावले आहेत. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज २६६ नवे रूग्ण ० मृत्यू तर ६८८ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत १ हजार ९६९ जणांचा मृत्यू झाला. मीरा-भाईंदरमध्ये आज ८५ नवे रूग्ण, ० मृत्यू, सध्या १८९ अॅक्टीव्ह रूग्ण आहेत तर आत्तापर्यंत १ हजार ३८० जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज १३ रूग्ण, ० मृत्यू, तर सध्या ५५ रूग्ण उपचारार्थ दाखल आहेत. आत्तापर्यंत ६४८ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज ६ रूग्ण, ० मृत्यू, सध्या १९ रूग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत ४७८ जणांचा मृत्यू झाला. अंबरनाथमध्ये ६ नवे रूग्ण, ० मृत्यू, सध्या ३२ रूग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत ५६३ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज ५ रूग्ण, ० मृत्यू तर २१ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आत्तापर्यंत ३८० जणांचा मृत्यू झाला आणि
ठाणे ग्रामीणमध्ये ११ नवे रूग्ण ० मृत्यू तर १०४ रूग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत १ हजार २३९ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading