ठाणे शहरात नवे कडक निर्बंध लागू

ओमिक्रॉन आणि कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी ठाणे महापालिका हद्दीत ३१ डिसेंबरच्या रात्री १२ वाजेपासून नवे कडक निर्बंध लागू करण्यात आले असून यापूर्वी लागू केलेल्या निर्बंधांसह नवीन नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी केले आहे. या नव्या निर्बंधांमध्ये सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळे यांसाठीची उपस्थितीची मर्यादा ठरवण्यात आली असून यापूर्वी लागू केलेल्या निर्बंधांसह नवे निर्बंध कोरोचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आले आहेत. यामध्ये कोणत्याही बंदिस्त ठिकाणी किंवा खुल्या मैदानात संपन्न होणाऱ्या लग्न समारंभांसाठी उपस्थितांची मर्यादा १०० वरून ५० करण्यात आली आहे. कोणत्याही बंदिस्त ठिकाणी किंवा खुल्या मैदानात संपन्न होणाऱ्या धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक किंवा राजकीय कार्यक्रमांसाठी ही मर्यादा ५० करण्यात आली आहे. अंतिम संस्कारासाठी उपस्थितांची मर्यादा आता अधिकतम २० असणार आहे. महापालिका क्षेत्रातील पर्यटक स्थळांवर, तलाव, क्रीडांगणे या सारख्या जास्त लोकांना आकर्षित करणाऱ्या ठिकाणी २४ डिसेंबरच्या आदेशानुसार लागू केलेल्या सर्व निर्बंधांसह जमावबंदी लागू करण्यात आले आहे. याशिवाय यापुर्वीच्या आदेशाप्रमाणे लागू असलेली सर्व निर्बंध पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading