कासारवडवली ते वागळे इस्टेट परिसरातील नालेसफाई कामाची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी

ठाणे महापालिकेच्यावतीने शहरात व्यापक प्रमाणात नालेसफाईची मोहीम हाती घेण्यात आली असून आज महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी कासारवडवली ते वागळे इस्टेट परिसरातील नालेसफाई कामाची पाहणी केली. शहरातील ६५ ते ७० टक्के नालेसफाई पूर्ण झाली असून उर्वरित नालेसफाईची कामे ८ ते १० दिवसात पूर्ण करण्याचे आदेश यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. महापालिकेच्या वतीने यंदा नालेसफाईची कामे एप्रिल महिन्यातच सुरू करण्यात आली असून महापालिका आयुक्तांनी नालेसफाई कामाचा पाहणी दौरा करण्यास सुरुवात केली आहे. आज सकाळी ९ वाजल्यापासून महापालिका आयुक्तांनी हिरानंदानी येथून नाले सफाई कामाची पाहणी करण्यास सुरूवात केली. यावेळी हिरानंदानी, ब्रह्मांड पार्क, बटाटा कंपनी, कासारवडवली नाला, कॅशलमिल नाकामी केव्हीला नाला, चंदनवाडी, वागळेप्रभाग समिती, मुलुंड चेक नाका, लोढा, यशस्वी नगर, रोड नं.१६, किसननगर तसेच आयटीआय येथील नाले साफसफाई कामाची पाहणी केली. या सर्व नाल्याची खोली वाढविणे, डेब्रिज उचलणे, नाल्याचा प्रवाह मोकळा करणे, प्रवाहातील अडथळे दुर करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी दिल्या. यंदा पावसाळ्यामध्ये कुठेही पाणी साचणार नाही याची दक्षता घेण्याच्या दृष्टीने अत्यावश्यक उपाययोजना करण्यासोबत नालेसफाईकडे गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी संबंधितांना दिल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading