मुंबई-नाशिक महामार्गावर चिखल झाल्यामुळं मोठी वाहतूक कोंडी

मुंबई-नाशिक महामार्गावर चिखल झाल्यामुळं या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. मुंबई-नाशिक महामार्गावरील मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या रस्त्यावरती एका अज्ञात ट्रकमधून हा चिखल पडला होता. या चिखलामुळे रस्ता निसरडा झाला होता. या चिखलावरून काही वाहनं घसरण्याचीही घटना घडली. याची माहिती मिळताच कापूरबावडी वाहतूक पोलीस अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, घनकचरा विभागाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांनी रस्त्यावरील हा चिखल हटवण्याचा प्रयत्न केला. हा चिखल लवकर निघत नसल्यामुळे अखेर अग्निशमन दलाच्या मदतीने पाण्याचा जोरदार फवारा मारून हा चिखल हटवण्यात आला. रस्त्यावरील हा चिखल हटवण्यासाठी बराच कालावधी लागला. यामुळे मुंबई-नाशिक महामार्गावरती साकेत ब्रीज पासून कॅडबरी सिग्नल पर्यंत तसेच, घोडबंदर रोडवरती माजिवाडा ब्रीज पासून ब्रम्हांड सिग्नल पर्यंत सुमारे १-तास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. सुदैवानं यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading