काशीनाथ घाणेकर नाट्यगृहासमोरील होर्डींग उभारण्यासाठी ५ लाखांचा हफ्ता घेणारा खासदार कोण – आमदार जितेंद्र आव्हाडांचा प्रश्न

काशीनाथ घाणेकर नाट्यगृहासमोरील धोकादायक होर्डींग उभारण्यासाठी ५ लाखांचा हफ्ता घेणारा खासदार कोण असा प्रश्न आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज एका पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहा समोरील होर्डींग पडलं आहे. या होर्डींगची उभारणीच बेकायदेशीररित्या करण्यात आली आहे. होर्डींग उभारण्यासंदर्भात न्यायालयानं काही निकष दिले आहेत. मात्र हे निकष न पाळताच ठाण्यातील होर्डींग्ज उभारण्यात आली आहेत. काल धोकादायक अवस्थेत पडलेलं होर्डींग उभारण्यासाठी एका खासदारानं ५ लाख रूपये घेतल्याचं सांगितलं जातं. ठाण्यात कुमार केतकर, श्रीकांत शिंदे, विनय सहस्रबुध्दे आणि राजन विचारे हे ४ खासदार राहतात. केतकर यांच्याशी आपलं बोलणं झालं असून ते पत्रकार परिषद घेऊन आपला संबंध नसल्याचं जाहीर करणार आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पत्रकार परिषद घेऊन आपल्या मुलाचा काही संबंध नाही हे जाहीर करावं. सहस्रबुध्दे यांनी विवेकबुध्दीनं आपली भूमिका जाहीर करावी, तर राजन विचारे यांनीही पूर्ण विचारांती आपली भूमिका सांगावी असं आवाहनही आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. वागळे इस्टेटमध्ये सुरू करण्यात आलेल्या डंपिंग ग्राऊंडमुळे या भागात राहणा-या ३० टक्के नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळं चार दिवसात हे डंपिंग ग्राऊंड बंद न केल्यास ते आपण बंद पाडू असा इशाराही आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या पत्रकार परिषदेत दिला. ठाण्यामध्ये घर खरेदी करताना जीएसटी आणि एलबीटी असे दोन्ही कर भरावे लागत आहेत. मात्र जीएसटी सुरू झाल्यानंतर एलबीटी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळं ज्यांची एलबीटी घेण्यात आली आहे त्यांचे पैसे परत करावे अशी मागणीही आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading