ठाण्याचे माजी महापौर मोहन गुप्ते यांचं निधन

ठाण्याचे माजी महापौर मोहन गुप्ते यांचं आज आजारपणामुळे दु:खद निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या मागे अमेरिकन सैन्यदलात मेजर असलेली मुलगी आणि पत्नी असा परिवार आहे. त्यांची कन्या आणि जावई शनिवारी येणार असल्यानं त्यांच्यावर रविवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मोहन गुप्ते हे ठाण्यातील एका कंपनीत उच्चपदावर कार्यरत होते. त्याचबरोबर सीकेपी क्लब, आर्य क्रीडा मंदिर, रोटरी क्लब अशा अनेक संस्थांशी त्यांचा संबंध होता. १९९०-९१ मध्ये त्यांनी ठाण्याचं महापौर पद भुषवलं होतं. सुरूवातीला काँग्रेसमध्ये असलेल्या मोहन गुप्ते यांनी नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading