काँग्रेस प्रवक्त्यांच्या मारेकऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा संबंधितांच्या घराबाहेर तीव्र आंदोलन करण्याचा मनोज शिंदेंचा ईशारा

काँग्रेस प्रवक्त्यांच्या मारेकऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा संबंधितांच्या घराबाहेर तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा मनोज शिंदे यांनी एका पत्रकार परिषदेत दिला आहे. मुख्यमंत्र्यां बद्दल अनुउद्गार काढले म्हणून शिवसैनिकांनी काँग्रेसच्या प्रवक्त्यांना मारहाण केली होती. काँग्रेस प्रवक्ते गिरीश कोळी यांनी नुकतीच फेसबुक वर चैत्र नवरात्रोत्सव म्हणजे राजकीय आखडाच झाला आहे, कोणी पण आयोजित करत या पोस्ट नंतर काल रात्री शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी कोपरी येथील नारायण कोळी चौकात मारहाण केली. तर आज आपली बाजू मांडण्यासाठी काँग्रेसच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेसचे नेते मनोज शिंदे यांनी मारेकऱ्यांवर लवकरात लवकर गुन्हा दाखल करून शिक्षा व्हावी अन्यथा संबंधितांच्या घराबाहेर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा दिला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading