कळवा रेल्वे स्थानकात एक प्रवासी दगड लागून जखमी

कळवा रेल्वे स्थानकादरम्यान काल रात्री काही समाजकंटकांनी केलेल्या दगडफेकीत एक प्रवासी जखमी झाला आहे. काल रात्री साडेआठच्या सुमारास कळवा फलाट क्रमांक १ वरून कल्याणच्या दिशेने जाणा-या लोकलवर काहीजणांनी दगडफेक केली. त्यावेळी कळवा स्थानकात उतरण्यासाठी दरवाजात उभ्या असणा-या बालचंद गुप्ता या प्रवाशाच्या नाकाला मार लागून रक्त येऊ लागले. या प्रवाशाला रेल्वे पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्या उपचार सुरू आहेत. अशाप्रकारच्या दगडफेकीच्या घटना दहाबारा वर्षापुर्वी ठाणे-कळवा दरम्यान मोठ्या प्रमाणात घडत होत्या. परंतु रेल्वे पोलिस आणि शिवसेनेच्या वतीने कारवाई करुन त्याला आळा बसला होता. या घटनेनंतरही शिवसैनिकांनी या प्रवाशाला रूग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली. आता यानंतरही अशा समाजकंटकांविरोधात पुन्हा मोहिम उभारली जाणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading