ठाण्याच्या ग्रिहिता विचारेमुळे ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. जगातील सर्वात उंच आणि कठीण ट्रेक माउंट एवरेस्ट बेस्ट कॅम्प ५ हजार ३६४ मिटर यशस्वीरित्या सर करणारी ग्रिहिता ही अवघी ८ वर्षांची आहे. खासदार राजन विचारे यांनी तिच्या या कर्तृत्वाबद्दल खास तिच्या घरी जाऊन तिचा सन्मान करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कष्ट, मेहनत आणि जिद्दीने तीने हे यश संपादन करून संपूर्ण महाराष्ट्राचे नव्हे तर ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.