ईस्टर्न एक्सप्रेस वेचा एलिव्हेटेड पध्दतीनं घाटकोपर ते ठाणे होणार विस्तार

ईस्टर्न एक्स्प्रेस फ्री-वेचा विस्तार आता घाटकोपरपासून थेट ठाण्यातील घोडबंदरच्या फाऊंटन हॉटेलसमोरील चौकापर्यंत होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच ही घोषणा केली आहे. शहरात होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून फ्री वे आता थेट घोडबंदरच्या टोकापर्यंत एलिवेटेड मार्गाद्वारे विस्तारित केला जाणार आहे. ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर पडणारा वाहतुकीचा प्रचंड ताण लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी एमएमआरडीएच्या माध्यमातून फ्री वेचा पर्यायी समांतर आणि तुलनेने जलदगती मुक्तमार्ग उभारला होता. सध्या छत्रपती शिवाजी टर्मिनस ते घाटकोपरपर्यंत वाहनचालकांना फ्रीवेच्या माध्यमातून जलदगतीने प्रवास करता येतो. तथापि घाटकोपरच्या पुढे विक्रोळी-भांडुप-मुलुंड ते अगदी ठाण्याच्या एन्ट्री नाक्यापर्यंत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. यामध्ये बहुसंख्य वाहने ही ठाण्याच्याही पुढे राज्यभरात जाणारी असतात, मात्र त्याचा मोठा फटका ठाणेकरांना सहन करावा लागतो. ठाणेकरांची ही वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेऊन एमएमआरडीएने घाटकोपरपासून पुढे ठाण्यापर्यंत आणि ठाण्यापासूनही पुढे घोडबंदर मार्गे फाऊंटन हॉटेलपर्यंत या ईस्टर्न एक्स्प्रेस फ्रीवेचा एलिव्हेटेड पध्दतीने विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading