कळवा-मुंब्र्यातून जितेंद्र आव्हाड यांचा शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल

कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जितेंद्र आव्हाड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी तुळजाभवानीचं दर्शन घेऊन भव्य मिरवणुकीनं जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेही उमेदवारी अर्ज दाखल करताना काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सहभागी झाले होते. शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या जागा वाटपात ही जागा शिवसेनेला गेली आहे. मात्र शिवसेनेला या जागेवर योग्य उमेदवारच मिळालेला नाही. सध्या शिवसेना या जागेसाठी योग्य उमेदवाराच्या शोधात आहे. जितेंद्र आव्हाड यांनी या मतदारसंघाचा चांगलाच कायापालट केला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading