मतदानाचा टक्का वाढावा याकरिता मतदान जनजागृतीकरिता जिल्ह्यात दोन दिवस फिरणार रथ

विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी तसंच मतदानाबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशानं जिल्हा प्रशासन आणि ठाणे क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्ह्यामध्ये महामतदार जागृती रथ फिरवण्यात येणार आहे. या रथाला जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी हिरवा झेंडा दाखवला. जिल्ह्यामध्ये १८ विधानसभा क्षेत्र आहेत. विधानसभा क्षेत्रात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी पुढील दोन दिवस हा रथ मतदानासाठी जागृती करत फिरणार आहे. मतदान जनजागृती कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. याचाच रथ हा एक भाग आहे. मतदान करा, मतदान करा, सुदृढ लोकशाहीसाठी मतदान करा असा संदेश देणा-या या रथासोबत ७ कलाकारांचा एक चमू असून नृत्य, गाणी तसंच दृकश्राव्य माध्यमातून हा रथ लोकांचं लक्ष वेधून घेत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading