कळवा पूलाजवळील शिवाजी महाराजांचा पुतळा चौपाटीवर प्रतिष्ठापित करून चौपाटीचं नामकरण महाराजांच्या नावे करण्याची मराठा सेवा संघाची मागणी

कळवा पूलाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चौपाटीवर प्रतिष्ठापित करून चौपाटीचं नामकरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे करावं अशी मागणी मराठा सेवा संघानं जिल्हाधिका-यांकडे केली आहे. संघाचे अध्यक्ष मंगेश आवळे यांनी जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात ही मागणी केली आहे. कळवा पूलाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते झालं होतं. मात्र या परिसरात बांधल्या जात असलेल्या नवीन पूलामुळे हा पुतळा दुर्लक्षित झाला आहे. नवीन पूलाच्या कामामुळे हा पुतळा झाकला गेला आहे. त्यामुळं खाडीकिनारी महापालिकेतर्फे विकसित होत असलेल्या चौपाटीच्या मध्यभागी हा पुतळा बसवावा आणि चौपाटीस छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्यावं अशी मागणी मराठा सेवा संघानं जिल्हाधिका-यांकडे केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading