जागृती पालक संस्थेच्या विशेष मुलींनी अग्निशमन दल आणि टीडीआरएफच्या जवानांना राखी बांधून दृढ केले नातेसंबंध

रक्षाबंधन म्हटलं की भावा-बहिणीच्या अनोख्या नात्याचा सण. मात्र ठाण्यातील जागृती पालक संस्थेच्या विशेष मुलींनी या सणाच्या निमित्तानं समाजाच्या सुरक्षेसाठी झटणा-या अग्निशमन दल आणि टीडीआरएफच्या जवानांना राखी बांधून नातेसंबंध दृढ केले. विशेष मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी गेल्या १७ वर्षापासून काम करणा-या जागृती पालक संस्थेच्या विद्यार्थिनींनी स्वत: तयार केलेल्या राख्या या जवानांच्या हातावर बांधताच त्यांच्याही डोळ्यात आनंदाश्रू तरळले. ठाण्यातील जागृती पालक ही विशेष मुलांची संस्था वर्षभरात प्रत्येक सण आगळ्या वेगळ्या पध्दतीनं साजरा करते. गेल्यावर्षी सफाई कर्मचारी आणि त्याआधी वाहतूक पोलीसांना राख्या बांधून या मुलींनी रक्षाबंधनाचा सण साजरा केला होता. यंदा पालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान आणि टीडीआरएफच्या जवानांना या विशेष मुलींनी राख्या बांधून राखी पौर्णिमा साजरी केली. या कार्यक्रमात संस्थेतील ४० विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि पालक सहभागी झाले होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading