आबासाहेब शेवाळे यांनी स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधून तयार केलं मंगळयान मोहिमेचं पुशपिन्सद्वारे चित्र

देशाचा ७३वा स्वातंत्र्यदिन पुशपिन्स कलाकार अण्णासाहेब शेवाळे यांनी आगळ्या वेगळ्या पध्दतीनं साजरा केला. जागतिक रेकॉर्ड होल्डर अण्णासाहेब शेवाळे यांनी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं देशभक्तीनं प्रेरीत असलेली मंगळयान मोहिम साकारली होती. यासाठी त्यांनी ४४ हजार ६५२ पुशपिन्सच्या माध्यमातून ८ बाय ६ फूटाचं चित्र तयार केलं. हे चित्र ठाण्यातील कोरम मॉलमध्ये येत्या २२ ऑगस्ट पर्यंत पहायला मिळणार आहे. अलिकडेच अण्णासाहेब शेवाळे आणि त्यांच्या सहका-यांनी महेंद्रसिंग धोनी एक चित्र बुध्दीबळाच्या सोंगट्यांनी साकारलं होतं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading