कळवा औषध विक्री हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा

कळवा औषध विक्री हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला असून चोरी आणि हत्या करण्यापूर्वी २ महिलांनी औषध दुकानाची पाहणी केली असल्याचं उघड झालं आहे. सध्या ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा या आरोपींचा शोध घेत आहे. दुकानात चोरी करून हत्या करणा-या तसंच दुकानाची पाहणी करणा-या दोन महिलांचं सीसीटीव्ही फूटेज गुन्हे शाखेनं जारी केलं आहे. २८ डिसेंबरला पहाटे चारच्या सुमारास शिवाजीनगर येथील वीर युवराज मेडीकलच्या गल्ल्यातून पैसे चोरत असतानाच दुकानाच्या काऊंटर आणि शोकेसच्या पोकळीतील मोकळ्या जागेत झोपलेले प्रेमसिंग राजपुरोहित यांना जाग आली आणि आवाज कुठून येतोय हे पाहण्यासाठी ते उठले असताना त्यांना तोंडाला रूमाल बांधून एक चोर गल्ल्यातून पैसे चोरताना दिसला. त्यांनी आरडाओरडा सुरू केल्यानं चोरट्यांनी प्रेमसिंग यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी प्रेमसिंग यांच्या छातीत लागल्यानं ते जागीच कोसळले. हा चोरटा एक महिला आणि मुलीसोबत कळवा रेल्वे स्थानकातील पादचारी पूलावरून मध्यरात्री १ च्या सुमारास येत असतानाचे दादर आणि माहिम रेल्वे स्थानकाच्या सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाल्याचं समोर आलं आहे. या चोरट्याची गुन्हे शाखेला कळवावी असं आवाहन पोलीसांनी केलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading