येत्या शुक्रवारी होणारं छायाकल्प चंद्रग्रहण संपूर्ण भारतातून दिसणार – दा. कृ. सोमण

या नूतन वर्षातील पहिले छायाकल्प चंद्रग्रहण येत्या शुक्रवारी म्हणजे १० जानेवारी रोजी पौष शाकंभरी पौर्णिमेच्या रात्री होणार असून ते संपूर्ण भारतातून दिसणार असल्याचं खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितलं. ज्यावेळी चंद्रबिंब पृथ्वीच्या दाट छायेभोवती असणा-या विरळ छायेमध्ये येतं त्यावेळी त्याला छायाकल्प म्हणजेच मांद्य चंद्रग्रहण म्हणतात. शुक्रवारी रात्री १० वाजून ३८ मिनिटांनी चंद्रबिंब पृथ्वीच्या विरळ छायेमध्ये येईल. उत्तर रात्री २ वाजून ४२ मिनिटांनी संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या विरळ छायेतून बाहेर पडेल असं सोमण यांनी सांगितलं. हे चंद्रग्रहण साध्या डोळ्यांनी पाहता येणार असून पौर्णिमा असूनही ग्रहणात चंद्रबिंब कमी तेजस्वी दिसेल असं दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading