कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ अखेर भारतीय जनता पक्षाच्याच वाट्याला

कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ अखेर भारतीय जनता पक्षाच्याच वाट्याला गेला आहे. हा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा अशी शिवसेनेची मागणी होती. या विरोधात पदाधिका-यांनी दंडही थोपटले होते. मात्र शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीच्या जागा वाटपात कल्याण पूर्व मतदारसंघ भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला गेला आहे. गेल्या निवडणुकीमध्ये कल्याण पूर्व आणि पश्चिम विधानसभा मतदारसंघांची निर्मिती झाली होती. कल्याण महापालिकेवर शिवसेनेचे वर्चस्व आहे मात्र हा मतदारसंघ अद्याप तरी शिवसेनेला आपल्याकडे खेचता आलेला नाही. कल्याण पूर्वचे विद्यमान आमदार गणपत गायकवाड हे अपक्ष म्हणून या मतदारसंघातून निवडून आले आहेत. आता भारतीय जनता पक्षानं गणपत गायकवाड यांनाच अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळं आता गणपत गायकवाड प्रथमच कमळ या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळं या निवडणुकीचा निकाल काय लागतो याकडे राजकीय निरिक्षकांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading