व्हीपीएम येथील व्याख्यानात विद्यार्थ्यांना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांची माहिती

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीनिमित्त समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्या वतीने डॉ. व्हि.एन.बेडेकर इन्स्टिटयुट ऑफ मॅनेजमेंट येथे आयोजित व्याख्यानात विद्यार्थ्यांना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांची माहिती देण्यात आली. बेडेकर महाविद्यालयाच्या पाणिनी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात मोहासूर व्यसनमुक्ती संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ देशमुख यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त समाधान इंगळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य सतिश जोशी, इतर मागासवर्ग महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक श्री. मेश्राम, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक श्रीमती. राणे, यावेळी बार्टीचे प्रकल्प अधिकारी मेधा पवार यांच्यासह जिल्ह्यातील समतादूत मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशमुख यांनी कार्यक्रमामधील उपस्थित विद्यार्थ्यांचे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जीवनावर आधारित उदाहरणे देवून प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading