कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कोविड१९ च्या सद्यस्थितीची माहिती आता एका क्लिकवर

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कोविड१९ च्या सद्यस्थितीची माहिती नागरिकांना आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. कोरोनाच्या अनुषंगाने माहिती देणारा डॅश बोर्ड विकसित करण्यात आला आहे. पालिकेच्या संकेतस्थळासह सोशल मीडियाशी हे जोडलेले असुन सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध असल्याची माहिती आयुक्त विजय सुर्यवंशी यांनी दिली. या डॅशबोर्ड ला भेट देण्यासाठी kdmc-coronavirus-response-skdcl.hub.arcgis.com वर क्लिक करावे. ‘डॅशबोर्ड’ चे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ड्रॉप मेनूचा उपयोग करून नागरिकांना कोणत्याही प्रभागातील कोविड परिस्थितीची स्थिती जाणून घेता येईल. शहराच्या स्थानिक नकाशावर संबंधित प्रभागांवर क्लिक करून नागरिकांना ही माहिती मिळू शकते. नागरिकांनी अचुक आणि अधिकृत माहितीसाठी या डँशबोर्डचा वापर करावा. अफवा अथवा अर्धवट माहितीवर विश्वास ठेवु नये असे आवाहन पालिकेनं केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading