कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा २०२३-२४ चा २ हजार २०६ कोटींचा अर्थसंकल्प

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा २०२३-२४ चा २ हजार २०६ कोटींचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी सभागृहात सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य सुविधांसह घनकचरा व्यवस्थापन , क्रीडा सुविधांवर भर देण्यात आला आहे. तसेच पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारकांना स्मशानभूमीत मोफत अंत्य संस्कार करण्यात येणार असल्याचा निर्णय देखील यंदाच्या या अर्थसंकल्पात घेण्यात आला. यंदा कोणतीही कर वाढ नसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात ६८ हेल्थ वेअरनेस सेंटर, नवीन प्रसुतीगृह आणि कॅन्सर सेंटर, कॅथलब, केमोथेरपी केंद्र, रेडीओथेर्पी केंद्र, नवीन सुपर स्पेशालिटी रुग्णालय, पाळीव प्राण्याचा दवाखाना, अद्ययावत रोगनिदान केंद्र यासारख्या आरोग्य सुविधा बाह्य यंत्रणा सुरु करत शहरातील आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठीची तरतूद आयुक्तांनी केली आहे. तर याचवेळी शहरातील स्वच्छतेवर विशेष भर देताना स्वच्छ भारत अभियानात आधारवाडी डम्पिंग ग्राउंड रिकामे करणे, कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प कार्यान्वित करणे, कचरा प्रकल्प वाढवणे, मोबाईल टॉयलेट यासारख्या सुविधाचा अंतर्भाव अर्थसंकल्पात करण्यात आला आहे.नागरिकांच्या आरोग्यासाठी क्रीडा सुविधांवर भर देण्यात आला. शहरातील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न गाजत असतानाच शासकीय धोरणानुसार अनधिकृत बांधकाम दंडात्मक कारवाईने अधिकृत करण्याची मोहीम राबविली जाणार असून शासकीय भूखंडावर नसलेल्या आणि नियमानुसार अधिकृत करता येणाऱ्या इमारती दंड भरून अधिकृत करून घेण्याची मोठी संधी या अर्थसंकल्पा दरम्यान आयुक्तांनी विकासकांना दिली आहे. यामुळे अनधिकृत बांधकामाच्या टांगत्या तलवारीसह जगणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading