भिवंडीत सराईत गुन्हेगारांनी केलेली चोरी उघडकीस आणण्यात पोलीसांना यश

भिवंडीत सराईत गुन्हेगारांनी केलेली चोरी उघडकीस आणण्यात पोलीसांना यश आलं असून चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. २१ एप्रिलला भिवंडीतील वडपा येथील जी कॉम लॉजिस्टीक्स या एलजी कंपनीच्या गोडावूनचे शटर उचकटून चोरट्यांनी एलजी कंपनीचे तीन एलसीडी टीव्ही आणि मोबाईल फोन्स असा एकूण साडे चाळीस लाखांचा माल चोरून नेला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक शिवाजी राठोड यांनी आरोपींना अटक करण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार गोडावूनमधील आणि बाहेरील सीसीटीव्ही चित्रीकरणातून आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यश डोंगरे आणि योगेश पाटील यांना शिताफीने ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आलं. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी परशुरामपाडा येथे जुन्या घरात माल लपवून ठेवल्याचं कबूल केले. त्यानुसार पोलीसांनी तीन एलसीडी टीव्ही, २५१ मोबाईल फोन्स तसंच गुन्ह्यात वापरलेली महिंद्र बोलेरो पिकअप असा एकूण ३४ लाख ६९ हजारांचा माल हस्तगत केला. लॉकडाऊनच्या काळात गुन्ह्यांचं प्रमाण कमी आलेलं असताना एवढ्या मोठ्या रक्कमेची चोरी उघडकीस आल्यानं खळबळ उडाली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading