कल्याणमध्ये फ्लिपकार्टच्या गोडावूनमधील चोरी प्रकरणी तिघांना अटक

कल्याण पूर्वेत सूचक नाका परिसरातील एका फ्लिपकार्टच्या गोडाऊनमध्ये रात्रीच्या सुमारास चोरी झाली होती.तीन अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनच्या मागील बाजूस असलेले ग्रिल उचकटून गोडाऊन मध्ये डिलिव्हरी साठी ठेवलेले मोबाईल बूट इतर महागडे साहित्य असा जवळपास सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हे तिन्ही चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले होते. कोळशेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे आणि पगारे यांच्या पथकाने या आरोपींचा शोध सुरू केला. चोरी केल्यानंतर तिन्ही चोरटे वेगवेगळ्या शहरात पसार झाले होते. पोलिसांचा सीसीटीव्ही फुटेच्या आधारे तपास सुरू असताना गोडाऊन मधून चोरीला गेलेल्या मोबाईल मधून एक मोबाईल सुरू झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आलं. पोलिसांनी या मोबाईलचा माग काढला असता हा मोबाईल जालन्यामध्ये असल्याचा निष्पन्न झालं. पोलिसांनी तात्काळ जालना गाठून तेथून राहुल पंडित या चोरट्याला बेड्या ठोकल्या. राहुलने चौकशी दरम्यान सागर शिंदे आणि अमन खान या त्याच्या दोन साथीदारांची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ सागर शिंदे याला उल्हासनगर येथून अटक केली या दरम्यान अमर खान मात्र पसार होण्यात यशस्वी झाला.राहुल पंडित सागर शिंदे आणि अमन खान या तिघांची मैत्री जेलमध्ये झाली होती. जेलमधून सुटल्यानंतर हे तिघे पुन्हा एकत्र भेटले. चोरी करण्याचा प्लॅन आखले ही चोरी करण्यासाठी राहुल पंडित यांनी नेरूळ येथून एक रिक्षा देखील चोरी केली. याच रिक्षात सागर पंडित आणि अमन खान बसले आणि या तिघांनी हे गोडाऊन फोडले होते. हे तिघे सराईत गुन्हेगार असून या तिघां विरोधात विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading