बाधित रहिवासी तसंच गाळेधारकांना बेघर न करता त्यांच्या रोजीरोटीसाठी महापालिकेनं केलेलं पुनर्वसनाचं काम कौतुकास्पद – पालकमंत्री

शहरातील रस्ते रूंद करताना बाधित रहिवासी तसंच गाळेधारकांना बेघर न करताना त्यांच्या रोजीरोटीसाठी महापालिकेनं केलेल्या पुनर्वसनाचं काम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्र्यांनी काढले. पालकमंत्र्यांच्या हस्ते रस्ता रूंदीकरण मोहिमेअंतर्गत वागळे इस्टेट रस्ता क्रमांक ३३ या रस्त्यावरील बाधित गाळेधारकांचं पुनर्वसन कामगार रूग्णालयाच्या भिंतीजवळ करण्यात आलं असून बाधित गाळेधारकांना पालकमंत्र्यांच्या हस्ते पुनर्वसन पत्र वाटप करण्यात आलं. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. महापालिकेनं मंजूर विकास आराखड्यातील रस्ते मोकळे करून ते रूंद करण्याचा महत्वाचा प्रकल्प हाती घेतला आहे. शहरातील सर्व रस्ते रूंद आणि प्रशस्त करताना अनेक अनधिकृत बांधकामं, निवासी तसंच वाणिज्य बांधकामं तोडण्यात आली आहेत. शहरातील सर्व रस्त्यांचं विकास आराखड्यामुळे रूंदीकरण झाल्यानं वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. रस्ते विकसित झाल्यामुळं मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा ताणही कमी झाला असल्याचं पालकमंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading