ओबीसी समाजाचा अपमान केल्याबद्दल काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात ठाण्यात भाजपाकडून तीव्र आंदोलन

ओबीसी समाजाचा अपमान केल्याबद्दल काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात ठाण्यात भाजपाकडून तीव्र आंदोलन करण्यात आले. कोर्ट नाका येथे झालेल्या आंदोलनात भाजपाच्या कार्यकर्त्यांसह ओबीसी समाजही सहभागी झाला होता. या आंदोलनात भाजपा कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांचा तीव्र शब्दांत धिक्कार केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘मोदी’आडनावावरून अपमानास्पद वक्तव्य केले. त्यातून ओबीसी आणि समाजाचा भाग असलेल्या तेली समाजबांधवांचा अपमान केला आहे. या वक्तव्यांबद्दल राहुल गांधींनी शिक्षा भोगावी, अशी मागणी भाजपाकडून करण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading