आकाशामध्ये काल संध्याकाळ नंतर एक अनोखे आणि नयनरम्य खगोलीय घटनेचा अनुभव घेता आला. पश्चिमेच्या चंद्र शुक्राची अनोखी युती पाहायला मिळाली. संध्याकाळी आकाशात चंदकोर आणि त्याखाली शुक्र ग्रह पाहायला मिळाला एखाद्या युवतीन चद्रकोर आणि त्याखाली लावलेल्या कुंकवासारख दृष्य आकाशात पाहायला मिळत होत. संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर पश्चिम आकाशात तृतीयेचा चंद्र आणि शुक्र ग्रहाची युती झाली होती. चंद्रकोरीच्या बरोबर खाली शुक्राची चांदणी दिसत होती. साधारणता संध्याकाळी ७ ते ७.४५ दम्यान या खगोलीय घटनेचा आनंद लुटता आला.