ए के जोशी शाळेच्या पूर्व प्राथमिक विभागानं रक्षाबंधनानिमित्त राबवला एक वेगळा उपक्रम

यंदा रक्षा बंधन आणि स्वतंत्रता दिन एकत्रित आल्याचं औचित्य साधून पूर्व प्राथमिक विभागाच्या ए. के. जोशी इंग्रजी शाळेनं एक वेगळा उपक्रम राबवला. सणाच्या निमित्तानं पर्यावरण रक्षण आणि पाळीव प्राण्यांची काळजी घेतली पाहिजे असा महत्वाचा संदेश शिक्षकांनी मुलांना आवर्जून दिला आणि पर्यावरण दिनाचं महत्वही पटवून दिलं. याचं प्रतिक म्हणून विद्यार्थ्यांनी झाडाला राखी बांधून त्यांचं रक्षण करण्याची शपथ घेतली. पाळीव प्राणी हे आपल्या जीवनातले महत्वाचे घटक आहेत. त्यासाठी शाळेतील सिनियर के.जी. विभागातील विद्यार्थ्याचे पालक नचिकेत परांजपे यांनी आपला पाळीव कुत्रा टायसनला शाळेत आणलं होतं. त्यांनी पाळीव प्राण्यांची कशी काळजी घेतली जाते हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. पाळीव प्राणी आपले मित्र आहेत आणि त्याचं प्रतिक म्हणून मुलांनी टायसनला राखी बांधली. त्याचप्रमाणे विविध स्वातंत्र्यसैनिक आणि नेते बनून आलेल्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाणीही गायली. अशात-हेनं ए.के. जोशी इंग्रजी माध्यमाच्या पूर्व प्राथमिक विभागानं रक्षाबंधन आणि स्वतंत्रता दिन उत्साहात साजरे केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading