वाघाचे कातडे विक्रीसाठी आणलेल्या व्यक्तीस अटक

ठाणे पोलीसांच्या गुन्हे शाखा घटक क्रमांक १ च्या पोलीसांनी वाघाचे कातडे विकण्यास आलेल्या व्यक्तीस अटक केली असून त्याच्याकडून वाघाचं कातडं हस्तगत केलं आहे. गुन्हे शाखा घटक क्रमांक १ चे पोलीस हवालदार सुभाष मोरे यांना मुंब्रा येथील वाय सर्कलजवळ एक व्यक्ती वाघाचे कातडे विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखा घटक क्रमांक १च्या पथकानं वाय सर्कलजवळ सापळा रचून काळ्या रंगाची बॅग घेऊन आला. पोलीसांनी त्याला हटकले आणि त्याची चौकशी केली असता त्याच्या बॅगेमध्ये १० लाख रूपये किंमतीचे वाघाचे कातडे मिळाले. हे कातडे तो विकण्यासाठी आला असल्याची माहितीही त्याने पोलीसांना दिली. त्याचं नाव शशिकांत दंडवते असून तो मूळचा कोल्हापूरचा आहे. त्याच्या विरोधात वन्य जीव संरक्षण कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading