दिव्यामध्ये महिला प्रवाशांनी रेल्वे पोलीसांना राखी बांधून साजरी केली राखी पौर्णिमा

दिव्यामध्ये महिला प्रवाशांनी रेल्वे पोलीसांना राखी बांधून राखी पौर्णिमा साजरी केली. भाऊरायाला राखी बांधण्यासाठी सकाळीच बाहेर पडलेल्या महिलांच्या रक्षणासाठी रेल्वे पोलीसांना सतर्क रहावं लागलं. स्वत: सणवाराचा आनंद घेऊ न शकणा-या या रेल्वे पोलीसांनी आम्ही दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या उपक्रमामुळे कामावर असतानाही राखी पौर्णिमेचा सण साजरा करू शकलो. मध्य रेल्वे मार्गावर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेक घटना महिला प्रवाशांच्या मनात धाकधुक निर्माण करणा-या आहेत. त्यामुळं रेल्वे प्रवाशांची जबाबदारी वाढली आहे. रेल्वे पोलीसही अनुचित घटना रोखण्यासाठी सतर्क असतात. त्यांच्या या कर्तृत्वाला सलाम करण्याकरिता तसंच पोलीसांनी हेच रक्षाबंधनाचे व्रत जोपासावे यासाठी राख्या बांधून राखी पौर्णिमा साजरी करण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading