विद्या प्रसारक मंडळाच्या ए. के. जोशी इंग्रजी माध्यमाचा शालांत परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे. या शाळेतील एकूण १२९ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यातील ११६ विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी मिळवत घवघवीत यश संपादन केलं आहे. तर १३ विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी मिळाली आहे. ए. के. जोशी शाळेतील श्रिया दाणेकर ही शाळेतून पहिली आली असून तिला ९८.२० टक्के मिळाले आहेत. तर तन्वी पाटील ९७.६० टक्के द्वितीय, आदित्य बापट ९७.२० टक्के तृतीय, मिहिर गोरे, सिध्दार्थ वेर्णेकर आणि प्रचिती जोग या तिघांना ९६.४० टक्के मिळाले असून ते चौथे आले आहेत तर पूर्वा जोशी हिला ९६ टक्के गुण मिळाले असून ती पाचवी आली आहे.