ठाण्यातील प्रगती अंध विद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के

ठाण्यातील प्रगती अंध विद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. प्रगती अंध विद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन करत दहावीत बाजी मारली आहे. या शाळेतील करण पवार हा ८९ टक्के गुण मिळवत शाळेत पहिला आला आहे. गजानन बोराडे आणि अजित गुप्ता यांना ८८ टक्के, हितेश पिंगळे ८७ टक्के, भूषण घरत ८३ टक्के तर सुषमा पाल हिने ७९ टक्के गुण मिळवले आहेत. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading