ठाण्यातील डॉ. बेडेकर विद्या मंदिरचा दहावीचा निकाल ९९.२५ टक्के

ठाण्यातील डॉ. बेडेकर विद्या मंदिरचा दहावीचा निकाल ९९.२५ टक्के लागला आहे. या शाळेतील २६९ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यातील २६७ विद्यार्थ्यांनी यश मिळवलं आहे. १३२ विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य, ९२ विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी, ३९ विद्यार्थ्यांना द्वितीय तर ४ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. नाविन्य मेटकरी हा विद्यार्थी शाळेतून प्रथम आला असून त्याला ९७.४० टक्के गुण मिळाले आहेत. आकांक्षा कोंढारे ९५.४०, दिप्ती लांबे ९४.८०, चेतन साबळे ९४.६०, अनिश मोकाशी ९४.४०, यश देशमुख ९४.२०, श्रावणी निकम ९४.२०, ओंकार सावंत ९४ टक्के, मानसी जाधव ९३.८०, श्रृती यादव ९३.८०, सानिका दळवी ९३.८०, श्रृतीका पर्शराम ९३.६० आणि स्मृती कोळी हिला ९३.४० टक्के गुण मिळाले आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading