एटीएम फोडून चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी मालमत्ता गुन्हे कक्षानं केली जेरबंद

एटीएम फोडून चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी मालमत्ता गुन्हे कक्षानं जेरबंद केली आहे. एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. ठाणे शहर गुन्हे शाखा अंतर्गत मालमत्ता गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रदीप भानुशाली यांनी कापुरबावडी पोलीस ठाण्यातील एक गुन्हा उघडकीस आणण्यासाठी तपास चालवला होता. त्यावेळी त्यादृष्टीनं शहरात गस्त घातली जात होती. ही गस्त घातली जात असताना पोलीसांना कापुरबावडी पोलीस स्टेशन हद्दीतील एटीएम फोडून चोरीचा प्रयत्न करणारे आरोपी बाळकूम परिसरात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार तांत्रिक पध्दतीनं माहिती घेऊन मालमत्ता गुन्हे शाखेकडील अधिकारी आणि कर्मचा-यांनी साकेत रोड येथे सापळा रचला आणि मिळालेल्या महितीप्रमाणे पर्वतसिंग चुंदावत, राजसिंग ठाकूर, अमोल यादव अशा तिघांना पकडलं. त्यांची चौकशी केली असता त्यांनी कापुरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एटीएम फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. या तिघांविरूध्द विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading