मुंबई क्रिकेट असोसिएशनवर ठाण्याला प्रतिनिधीत्व – विहंग सरनाईक यांची निवड

मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये ठाण्याला प्रतिनिधीत्व मिळालं आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत मॅनेजिंग कमिटी मेंम्बर म्हणून ठाण्याचे माजी नगरसेवक विहंग सरनाईक निवडून आले आहेत. राष्ट्रीय पातळीवरील उंच आणि लांब उडीमधील खेळाडू म्हणून ओळख असलेल्या विहंग सरनाईक यांना खेळाडूंना काय सुविधा लागतात हे चांगलं माहिती आहे. विहंग सरनाईक यांना मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत १६५ मतं मिळाली आहेत. मुंबई-ठाण्यातील ३५० क्लब आणि ३९ दिग्गज क्रिकेट पटू यांनी या निवडणुकीत मतदान केलं. सरनाईक यांना विक्रमी मतं मिळाली आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading