१८ विधानसभा मतदारसंघासाठी ३०० उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्रं दाखल – २२५ उमेदवार वैध

जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघासाठी ३०० उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्रं दाखल केली असून त्यापैकी २२५ उमेदवार वैध ठरले आहेत. तर ३८ उमेदवार अवैध ठरले आहेत. सर्वाधिक म्हणजे ३० उमेदवार कल्याण पश्चिमेत तर सर्वात कमी म्हणजे ६ उमेदवार डोंबिवली आणि ठाणे विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत. काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. कालच्या एका दिवसातच १८ विधानसभा मतदारसंघामध्ये २१९ उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्र दाखल केली. यामध्ये भिवंडी ग्रामीण ९, शहापूर १०, भिवंडी पश्चिम ८, भिवंडी पूर्व १९, कल्याण पश्चिम ३०, मुरबाड ८, अंबरनाथ १९, कल्याण पूर्व २०, डोंबिवली ६, कल्याण ग्रामीण १६, ओवळा-माजिवडा १४, कोपरी-पाचपाखाडी ११, ठाणे ६, कळवा-मुंब्रा १६, ऐरोली १३ तर बेलापूरमध्ये २० उमेदवार वैध ठरले आहेत. उल्हासनगर आणि मीरा-भाईंदरच्या अर्जांच्या छाननीचा अहवाल अद्याप हाती आलेला नाही. सोमवारी नामनिर्देशन पत्र मागे घेता येणार आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading