एटीएममध्ये मदत करण्याच्या बहाण्यानं फसवणूक करणा-या दोघांना अटक – ५० हून अधिक कार्ड हस्तगत

एटीएममध्ये मदत करण्याच्या बहाण्यानं एटीएम कार्डाची फसवणूक करणा-या दोघा गुन्हेगारांना पोलीसांनी अटक केली असून त्यांच्याकडून वेगवेगळ्या बँकांची ५३ एटीएम कार्ड जप्त करण्यात आली आहेत. शंभुनाथ योगी हे दहिसर येथील विजया बँकेच्या एटीएम मधून पैसे काढत असताना तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्याकडील येस बँकेचे एटीएम कार्ड वापरून ही फसवणूक केली. योगी पैसे काढत असताना या तिघांनी त्यांना मदत करण्याच्या बहाण्यानं त्यांच्या एटीएम कार्डाचा पिन नंबर मिळवला आणि वेगवेगळ्या बँकांच्या एटीएममधून २९ हजार ९०० रूपये काढून त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी योगी यांनी शीळ-डायघर पोलीसांकडे तक्रार केली होती. या तक्रारीचा समांतर तपास सुरू असताना श्रीकांत गोडबोले, प्रवीण साबळे आणि विनोद सांगरे यांची माहिती मिळाली. त्यांना नाशिक येथून ताब्यात घेण्यात आलं. त्यांच्या चौकशीत त्यांच्याकडे वेगवेगळ्या बँकांची ५३ एटीएम कार्ड मिळाली. या तिघांनी सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर, पुणे, अमरावती, वर्धा, जालना, नांदेड, बीड, लातूर, यवतमाळ अशा भागांमध्ये फसवणूक केल्याची कबुली पोलीस तपासात दिली आहे. अशाप्रकारे फसवणूक झाली असल्यास गुन्हे शाखा घटक क्रमांक १ शी २५३४ ३५६५ या दूरध्वनीवर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading