अंमली पदार्थ विकण्यासाठी आलेल्या एका आरोपीला अटक

अंमली पदार्थ विकण्यासाठी आलेल्या एका आरोपीला गुन्हे शाखा घटक क्रमांक १ नं अटक केली आहे. गुन्हे शाखा घटक क्रमांक १ मधील पोलीस हवालदार आनंद भिलारे यांना एक व्यक्ती कल्याण फाट्याजवळील मुंब्रा-पनवेल रस्त्याला असलेल्या हॉटेल न्यू सुनिल बार ॲण्ड रेस्टॉरंट जवळ मेथेम्पटामाईन हा अंमली पदार्थ विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार या हॉटेलजवळ सापळा रचून शरीफ गाझी याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून सुमारे साडेसात लाख रूपयांच्या ५१ ग्रॅम ४९९ गोळ्या मिळाल्या. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading