संकेत देशपांडे करंडक २०२० या राज्यस्तरीय द्विपात्री स्पर्धेत हर्षाली बारगुडे आणि रितेश पिटले यांनी प्रथम क्रमांक

संकेत देशपांडे करंडक २०२० या राज्यस्तरीय द्विपात्री स्पर्धेत हर्षाली बारगुडे आणि रितेश पिटले यांनी प्रथम क्रमांक पटकावला. अभिनय कट्टा आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. या स्पर्धेत राज्यभरातून १२० कलाकार सहभागी झाले होते. अक्षता साळवी आणि प्राची सोनावणे यांनी द्वितीय तर अवंतिका चौगुले, सुहास शिंदे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. निकेत हळवे आणि राहुल जगताप, गणेश कदम आणि अजय कुलकर्णी, स्वप्नील धनावडे आणि तन्मय राऊत, मानसी पवार आणि प्रगती नाईकवडी, सागर पवार आणि आदर्श गायकवाड या जोड्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading