एक दिवस मुख्य धारेतील मुलं सिग्नल शाळेत प्रवेशासाठी येतील – विनय सहस्रबुध्दे

सिग्नल शाळा हे शिक्षण क्षेत्रातील धाडसी पाऊल असून सिग्नल शाळेनं शिक्षणाचा परीघ मोठा करत वंचित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. रोबोटीक लॅब सारख्या आधुनिक सुविधा सिग्नल शाळेत उभ्या राहत आहेत. एक दिवस मुख्य धारेच्या शाळेतील मुलं सिग्नल शाळेत प्रवेशासाठी येतील असा विश्वास खासदार विनय सहस्रबुध्दे यांनी व्यक्त केला. सिग्नल शाळेतील रोबोटिक लॅबचं उद्घाटन विनय सहस्रबुध्दे यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. शिक्षण हक्क कायदा आणि सर्व शिक्षा अभियानासारख्या शासकीय कार्यक्रमानंतरही शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांना सिग्नल शाळेमुळं शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येता आले. सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत क्रीडांगण, तंत्रकुशल रोबोटीक लॅब अशा आधुनिक सुविधा सिग्नल शाळेत आहेत असं विनय सहस्रबुध्दे यांनी सांगितलं. एसबीआय लाईफ इन्शुरन्स कंपनीने सिग्नल शाळेला रोबोटिक लॅब उभी करून देत असताना एकप्रकारे देशाच्या पुढील पिढीच्या भवितव्याचे इन्शुरन्स काढल्यासारखे आहेत. सिग्नल शाळेचा प्रयोग ठाण्यासोबतच राज्य आणि देश पातळीवर राबवला जावा त्याला एसबीआय लाईफ इन्शुरन्स सर्वतोपरी सहकार्य करेल असा विश्वास आनंद पेजावर यांनी व्यक्त केला. रोबोटिक लॅबच्या माध्यमातून सिग्नल शाळेतील पहिली ते दहावीच्या मुलांना रोबोटिक प्रोग्रामिंग हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचे ज्ञान मिळणार असून प्रत्यक्ष रोबो बनवण्याची संधीही मुलांना मिळणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading