नौपाड्यातील सोहम ट्रॉपिकल या इमारतीच्या २२व्या मजल्यावर भीषण आग

नौपाड्यातील सोहम ट्रॉपिकल या इमारतीला आज मोठी आग लागली होती. ही इमारत तळ अधिक २२ मजले असून नौपाड्यातील एक उंच इमारत म्हणून ओळखली जाते. ही इमारत सध्या बांधली जात असून इमारतीच्या २२व्या मजल्यावर आग लागली होती. ही आग नक्की कशामुळे लागली हे समजू शकलं नाही. या इमारतीमध्ये तळमजल्यावर दुकानं आणि बँका असून आग लागल्याचं समजताच या दुकानं आणि बँकांतील कर्मचा-यांना खबरदारीचा उपाय म्हणून बाहेर काढण्यात आलं. अग्निशमन दलानं त्वरीत धाव घेऊन ही आग विझवण्यास सुरूवात केली. उंच इमारतींची आग विझवण्यासाठी वापरलं जाणारं अग्निशमन दलाचे ब्रेन्टो व्हेईकल या ठिकाणी आणण्यात आलं होतं. यामुळं महत्वाचा असा महात्मा गांधी रस्ता दोन्ही बाजूनं बंद करण्यात आला होता. या आगीमुळं मोठा धूर निर्माण झाला होता. ही आग बघण्यासाठी बघ्यांचीही तोबा गर्दी झाली होती. सुदैवानं या आगीत कोणतीही जिवितहानी झाली नाही. दुपारी ही आग विझवण्याचं काम सुरू होतं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading